विलेपार्लेत रस्त्यावरील गटाराचे चेंबर धोकादायक; दुर्घटनेची भीती

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले

महापालिकेने तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी

मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील शहाजीराजे महापालिका शाळेजवळील रस्त्याववरील गटाराचे चेंबर निखळल्याने परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. चेंबरचा भाग तुटून खाली कोसळण्याची शक्यता असल्याने महापालिकेने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर तीन ते चार शाळा आणि दोन रुग्णालये आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, रुग्णवाहिका तसेच रुग्णांच्या नातेवाइकांची या मार्गावर सतत वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी गटाराचे चेंबर धोकादायक स्थितीत असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुर्घटना घडण्याची वाट न पाहता महापालिकेने तातडीने चेंबरची दुरुस्ती करून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


Share

One thought on “विलेपार्लेत रस्त्यावरील गटाराचे चेंबर धोकादायक; दुर्घटनेची भीती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *