राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सचिन गवळी सन्मानित!

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

बोर्डी येथे ६५ व्या राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

मालाड, ता. १५ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६५ व्या राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशनात बोरिवलीतील सुविद्या प्रसारक संघाचे मनोहर हरिराम चोगले विद्यालय (माध्यमिक विभाग) यांचे मुख्याध्यापक सचिन गवळी यांना प्रतिष्ठेचा ‘राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी बोर्डी, तालुका डहाणू, जिल्हा पालघर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, शाळेच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी दिलेले योगदान यांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सचिन गवळी यांनी हा पुरस्कार केवळ वैयक्तिक यश नसून शाळेतील शिक्षक, सहकारी, पालक आणि हितचिंतक यांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव असल्याचे सांगितले. या प्रवासात मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या सुविद्या प्रसारक संघाचे पदाधिकारी, शिक्षण अधिकारी, आर-वेस्ट वॉर्डचे सहनिमंत्रक, मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी व माजी मुख्याध्यापक सदस्य, शिक्षकवृंद आणि सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

गवळी हे बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेच्या मुंबई विभागाचे प्रवक्ता व उपाध्यक्ष, तसेच आर-वेस्ट वॉर्डचे मुख्य निमंत्रक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या या सन्मानाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


Share

2 thoughts on “राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सचिन गवळी सन्मानित!”

  1. आपले खुप खुप अभिनंदन आपणास जीवनात खुप यश प्राप्त हो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *