MPSC पेपरफुटीविरोधी आंदोलनाला यश; तुकाराम मुंढेंकडे चौकशीची जबाबदारी

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोरले.

मुंबई :एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; ११ दिवसांनंतर आंदोलन स्थगित! एमपीएससी परीक्षेतील कथित पेपरफुटीविरोधात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ११ दिवसांनंतर यश आले. संबंधित अध्यक्षांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून, चौकशीसाठी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शिवेंद्र राजे भोसले यांनी सरकारी पत्राद्वारे आंदोलकांना दिली. सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले. आता चौकशी आणि दोषींवरील कारवाईकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.


Share

One thought on “MPSC पेपरफुटीविरोधी आंदोलनाला यश; तुकाराम मुंढेंकडे चौकशीची जबाबदारी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *