एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या १४ मे २०२६ रोजीच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार १६२-मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम २० जून २०२६ पासून सुरू असून, ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) प्रत्येक मतदारापर्यंत एनुमरेशन फॉर्म पोहोचवून ते भरून घेणे व निर्धारित वेळेत त्याचे संकलन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी या कार्यक्रमासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार एनुमरेशन फॉर्म संकलनासोबतच त्याचे डिजिटायझेशन तसेच डीएसई , पीएसई आणि एएसडीडी संदर्भातील कामकाजही निश्चित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेऊन , पुढील नियोजन करणे आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी समन्वय साधण्यात आला
बैठकीस शिवसेना, भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, मनसे,काँग्रेस तसेच अन्य राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मतदार नोंदणी अधिकारी तथा १६२-मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या अधिकारी प्रियांका आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आयुब तांबोळी, यांनी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात माहिती देत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.प्रसंगी नायब तहसीलदार जाधव आणि प्रकाश परदेशी हे ही उपस्थित होते.
Gd