कामगार दिनानिमित्त संयुक्त जयंती उत्साहात साजरी..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

मुंबई : मालाड मालवणी येथे संयुक्त महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन, महापुरुष- महानायिका संयुक्त जयंती तसेच बहुजन अन्याय अत्याचार निर्मूलन कृती समितीच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या प्रसंगी सुजात आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सध्याच्या घडामोडींवर प्रभावी भाष्य करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. अभिनेते पृथ्वीक प्रताप आणि दिग्दर्शक किशोर बेलेकर यांनीही आपल्या अनुभवातून समाज प्रबोधनाचा संदेश दिला.
कार्यक्रमादरम्यान चिमुकल्यांनी शिव-भीम गीतांवर आधारित सांस्कृतिक सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणातून सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
आरोग्य सेवेच्या दृष्टीने ऑस्कर हॉस्पिटलच्या माध्यमातून ईसीजी आणि रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा ४५० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.
तसेच बहुजन अन्याय अत्याचार निर्मूलन कृती समितीच्या वतीने उपस्थितांसाठी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्याम झळके यांनी सुजात आंबेडकर, पृथ्वीक प्रताप, किशोर बेलेकर तसेच सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. सामाजिक एकात्मता, सेवाभाव आणि प्रबोधनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वी ठरला.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *