घाटकोपर पंतनगर येथे 2कार मध्ये ई-सिगारेट जब्त.

Share

एसएमएस-प्रतिनिधी-मिलन शहा.

मुंबई : घाटकोपर पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिळक रोड परिसरात असलेल्या ‘त्रिवेदी पान शॉप’वर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात ई-सिगारेट व आयातीत सिगारेट जप्त केल्या आहेत.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संबंधित पान शॉपचा मालक दुकानापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या नॅनो आणि बलेनो कारमधून ई-सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत होता. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही वाहनांची झडती घेतली असता अंदाजे ९० ई-सिगारेट आणि १३५ आयातीत सिगारेट आढळून आल्या.
यानंतर पोलिसांनी ‘त्रिवेदी पान शॉप’ची पंचांसमक्ष झडती घेतली असता दुकानातून आणखी ८ ई-सिगारेट आणि ५ आयातीत सिगारेट जप्त करण्यात आल्या.
कारवाईदरम्यान नॅनो आणि बलेनो ही दोन्ही वाहने जप्त करण्यात आली असून, पालिकेच्या च्या ‘एन’ वॉर्डच्या सहकार्याने संबंधित पान शॉपचे तात्काळ निष्कासन करण्यात आले.
सदर प्रकरणी पान शॉप मालकाविरोधात ई-सिगारेट प्रतिबंधात्मक कायदा तसेच कोटपा (COTPA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांनी दिली.
या कारवाईदरम्यान स्थानिक नगरसेवक श्रीमती राखी जाधव आणि धर्मेश गिरी हे देखील उपस्थित होते.


Share

One thought on “घाटकोपर पंतनगर येथे 2कार मध्ये ई-सिगारेट जब्त.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *