
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : मालाड पश्चिमेतील मालवणी गेट क्रमांक ८ येथील अंबोजवाडी परिसरातील बाजाराच्या मुख्य रस्त्यालगत पदपथावर करण्यात आलेली अतिक्रमणे तसेच रस्त्यावरील घरांशी संबंधित व्यावसायिक आस्थापनांचे तात्पुरते वाढीव बांधकाम बुधवारी पालिकेच्या पथकाने निष्कासित केले.
पदपथ व्यापून तसेच रस्त्याच्या भागात करण्यात आलेल्या या वाढीव बांधकामांमुळे पादचारी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या पथकाने कारवाई करत अतिक्रमणे हटविली. कारवाईदरम्यान पालिकेचे अधिकारी व कर्मचारी, जेसीबी तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पालिकेच्या या कारवाईमुळे अंबोजवाडीतील पादचाऱ्यांना तसेच वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून, रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.
करवाई जरूर करा पण गरीबाला रोड वर आणु नये त्यानचा सुदधा कुठे तरी सोय करुन दयावी