
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरातील साने गुरुजी वसाहतीमधील ब्लॉक क्रमांक २ येथे रस्त्यावरील गटारांची झाकणे तुटल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी गटारांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कंत्राटदारामार्फत गटारातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मात्र गाळ उपसताना अनेक ठिकाणी गटारांची झाकणे तुटून पडली असून ती अद्याप बदलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही वाहनांची चाके थेट गटारात अडकण्याच्या घटना घडत असून त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, स्वच्छता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कामादरम्यान झाकणे तुटल्यास तत्काळ नवीन झाकणे बसविण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची असून ती योग्य पद्धतीने पार पाडली गेली पाहिजे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
याच परिसरात एक खासगी रुग्णालय असल्यामुळे रुग्णवाहिकांनाही ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेने तातडीने नवीन झाकणे बसवावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Bmc काय सुंदर काम वाह