गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत दफ्तर वाटप..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मालाड, ता. १५ (बातमीदार) : मालाड पश्चिम येथील मालवणी म्हाडा परिसरातील गोल्डन हॉलमध्ये शिव सम्राट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत दफ्तर वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक कार्यकर्ते सम्राट बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी सम्राट बागुल यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा परिचय करून देत विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास मालवणी परिसरातील विविध सामाजिक संस्था, महिला कार्यकर्त्या तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अंकुश भाटकर, मीनाली भाटकर, श्रद्धा मुळीक, अब्दुल करीम सर आणि रितेश जाधव यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दफ्तरांचे वाटप करण्यात आले. दफ्तर मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *