‘मंगेश विद्या मंदिर’ शाळेचा स्नेहमीलान उत्साहात..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

मुंबई : मालाड पूर्व येथील मंगेश विद्या मंदिर शाळेच्या १९९२ च्या दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहमेळावा रविवारी (१४ जून) मालाड पश्चिम येथील आस्वाद सीडब्लूसी बँक्वेट येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल ३४ वर्षांनंतर वर्गमित्र आणि गुरुजन एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि अनेकांसाठी हा क्षण भावनिक ठरला.
सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. यावेळी धांडे, पाटोळे, लेंभे, सारुळे, ठाकूर, भिरुड तसेच बावकर, दीक्षित, काळे आणि प्रभू या शिक्षकांनी विशेष उपस्थिती दर्शविली. “विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत मिळवलेले यश हीच आमची खरी गुरुदक्षिणा आहे,” अशा भावना उपस्थित गुरुजनांनी व्यक्त केल्या.
प्रार्थनेने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देत मनमोकळ्या गप्पा, छायाचित्रे, सेल्फी आणि स्नेहभोजनाचा सर्वांनी आनंद लुटला. अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रमंडळींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत पुन्हा एकदा बालपण अनुभवले.
“लवकरच पुन्हा भेटू,” या वचनासह सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. स्नेह, आपुलकी आणि गुरू-शिष्य नात्याचा अनोखा संगम अनुभवायला मिळालेला हा स्नेहमेळावा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणार आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *