
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मालाड, ता. १५ (बातमीदार) : दरवर्षीप्रमाणे यंदाही आदर्श विद्यालय गोरेगाव पश्चिम येथे २०२६-२७ या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जून रोजी प्रवेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात करण्यात आली. विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देत नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ करण्यात आला.
या प्रवेशोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी योगेंद्र सावंत व स्मृती सावंत (१९८६ बॅच) यांच्या सहकार्याने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध जादूगर प्रदीप कामथ जादूगाराच्या आकर्षक प्रयोगांनी विद्यार्थ्यांना आनंदाची अनोखी अनुभूती मिळाली. स्वागत सोहळ्यातील विविध क्षण विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरले.
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभणे, पर्यवेक्षिका श्रीमती गडांकुश, ज्येष्ठ शिक्षक सहारे सर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने प्रवेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला