
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई : ताडदेव येथील युसुफ मेहेरअली विद्यालयाच्या मराठी ००माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांचे २०२६-२७ या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पेन, चॉकलेट व फुले देऊन त्यांचे औक्षण करण्यात आले.
यावेळी युसुफ मेहेरअली मेमोरियल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर कारंजकर, विजया चौहान , संस्थेच्या पदाधिकारी जयाबाई तावडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका जयश्री जाधव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेवती मोहिते यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, सर्वसाधारण विद्यार्थ्यांसोबतच यंदा दहा दृष्टिहीन दिव्यांग विद्यार्थ्यांनीही या विद्यालयात प्रवेश घेतला असून, त्यांचेही विशेष स्वागत करण्यात आले.
शिक्षणासोबतच सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे पालक व उपस्थितांनी कौतुक केले.