
एसएमएस -प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालाड पश्चिम विधानसभेचे विभाग अध्यक्ष शशांक डेहलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालाड पश्चिम येथील नागरिकांसाठी एस वी रोड येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरती प्रती लिटर ५ रूपये सुट देण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, आणि नागरिक बोलले जे सरकार करु शकत नाही,ती गोष्ट सन्माननीय राजसाहेब हेच करू शकतात. सदर कार्यक्रमावेळी उपाध्यक्ष विरेंद्र जाधव, मनविसे उपाध्यक्ष विनायक राऊत, मनवासे उपाध्यक्ष सुरेश चौरसिया, मनविसे विभाग अध्यक्ष आकाश जाधव, मनिष शेटकर, उपविभाग अध्यक्ष दिपक चव्हाण, हेमंत कासले, शाखा अध्यक्ष सुनिल घोंगे, श्याम दासरी, महेश गोताड, शाखा सचिव तुषार चंदेले, प्रसाद नलावडे, राजु शिंदे, काके पराज व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. विभाग अध्यक्ष. शशांक संदेश डेहलीकर यांनी माहिती दिली.
Very good