
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड क्रमांक ४९ अंतर्गत शाखा क्रमांक ४९ च्या वतीने मनसे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मढ येथील लिटल एंजल अनाथ आश्रमात सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आश्रमातील मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच सर्व मुलांना मिठाईचे वाटप करून त्यांच्यासमवेत आनंदाचे क्षण अनुभवण्यात आले. या उपक्रमामुळे मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
शाखा क्रमांक ४९ चे अध्यक्ष सुनिल घोंगे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. समाजाप्रती बांधिलकी जपत गरजू आणि वंचित मुलांसोबत आनंद वाटण्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
Gd