प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम.

Share

एसएमएस –प्रतिनिधी

मुंबई : : रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयात प्रा. डॉ. एन. डी. पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त सरांच्या विविध आठवणींना उजाळा देऊन  उत्साहात  कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार व उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार विजेते निसार  अली  हे होते. त्यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या कार्याचा प्रेरणादायी परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे सदस्य  मदनराव चव्हाण हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयातील विविध मंडळांचे उद्घाटन एस. एन. अली  यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  शिल्पा जरे यांनी प्रास्ताविकात प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक व शेतकरी चळवळीतील योगदानाबरोबरच विद्यालयाच्या उभारणीतील त्यांच्या मोलाच्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कु. दुर्वा यादव हिने कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. तसेच कु. मोक्षा, कु. आरोही व कु.मधुरा यांनी डॉ. एन. डी. पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून सांगणारी प्रभावी भाषणे केली.

प्रबळकर निवृत्ती,सहा.शिक्षक यांनी प्रमुख वक्ते निसार अली  यांच्या कार्याचा परिचय करून दिला.मुख्याध्यापिका शिल्पा जरे यांनी त्यांना शाखा माहीती पुस्तिका भेट दिली. प्रमुख पाहुणे मा. निसार अली अहमद यांनी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय निश्चित करून प्रामाणिक परिश्रम, सामाजिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित जीवनाचा स्वीकार करावा, असा प्रेरणादायी संदेश दिला. अध्यक्षीय समारोपात मा. मदनराव चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास विद्यार्थी,पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share

One thought on “प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *